

खरातच्या ट्रस्टचा उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू
जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूवरून उलटसुलट चर्चा
शेळकेंच्या मृत्यूवरून अंधारे आणि मिटकरींकडून घातपाताचा संशय
शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची कसून चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. चौकशीतून या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांना चौकशीत अशोक खरातकडे कोट्यवधींची बेकायदेशीर माया असल्याचेही समोर आलं आहे. अशोक खरातनंतर आता त्याच्याशी संबंधित लोकांची चौकशी सुरू झाली आहे. याचदरम्यान अशोक खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. शेळकेंच्या मृत्यूवरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे शेळकेंच्या मृत्यूने चर्चांना उधाण आलं आहे.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा आज बुधवारी शिर्डीजवळ समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय. शेळकेंच्या अपघातावरून सत्ताधारी, विरोधी नेत्यांनीही शंका उपस्थित केली आहे.
जितेंद्र शेळके यांच्या अपघात प्रकरणावर अमोल मिटकरी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'चौकशी लागली असतानाच दोन दिसवांत शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. शेळकेंचा अपघात की घातपात , हा मोठा संशय त्यांनी व्यक्त केलाय. जितेंद्र शेळके यांच्या वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते? याचा शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. शोक खरात प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
दुसरीकडे शेळकेंच्या अपघातावरून घातपाताचे आरोप भाजप आमदार फरांदे यांनी फेटाळून लावले आहेत. जितेंद्र शेळके यांचा अपघात घातपात कसा असू शकतो? घातपात म्हणणे चुकीचे आहे. गृह विभागाने खरातचे काळे कारनामे बाहेर काढलेत. गृह विभाग, ईडी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. महिलांचं शोषण झालंय. त्यांना न्याय मिळणं महत्वाचं आहे. महिला लैंगिक शोषणाचे गुन्हे फास्ट ट्रॅकवर चालवावेत, ही मागणी फरांदेंनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.