Maharashtra Political News: चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे कंस मामा, त्यांनी रावणाचं रुप घेतलंय; सख्ख्या भाच्याने केली खरमरीत टीका

बीआरएसचे नेते जयकुमार बेलाखडे यांनी त्यांचे मामा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
Chandrashekhar bavankule
Chandrashekhar bavankulesaam tv
Published On

Pandharpur News: राज्याच्या राजकारणात अनेक काका-पुतणे, मामा-भाच्याची जोडी प्रसिद्ध आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, दिवंगत गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे या काका-पुतण्याची जोडी प्रसिद्ध आहे. तर बाळासाहेब थोरात-सत्यजीत तांबे या मामा-भाच्याची जोडी देखील प्रसिद्ध आहे.

या नात्यात कुठे गोडी तर कुठे भांडण आहे. यानंतर आणखी एक मामा-भाच्याची जोडी प्रकाशात आली आहे. मात्र, या भाच्याने त्यांच्या मामावर टीका केली आहे . बीआरएसचे नेते जयकुमार बेलाखडे यांनी त्यांचे मामा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. (Latest Marathi News)

बीआरएसचे नेते जयकुमार बेलाखडे यांनी भाजप सोडून बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. बेलाखडे यांनी नुकतेच मतदारसंघातील ३ हजार नागरिकांना घेऊन पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेतले. यानंतर बेलखाडे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बेलखाडे यांनी मामा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.

बेलाखडे म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे कंस मामा आहेत. त्यांनी रावणाचं रूप घेतले. भाजपच्या १०८ माळेच्या मण्यातील एक मणी आहे. मामाला काही कळत नाही'.

Chandrashekhar bavankule
Narendra Modi America Visit: यूएनमध्‍ये योग, जो बायडन यांच्या सोबत डिनर... असा असेल PM मोदींचा संपूर्ण दौरा

दरम्यान, बेलाखडे यांनी भाजपची साथ सोडत बीआरएसचा हात पकडला आहे. बेलाखडे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र त्या मतदारसंघात फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे हे विधानसभा लढविण्याच्या तयारीत आहेत. अशातच बेलाखडे हे बीआरएस पक्षात गेले आहेत. बेलाखडे यांनी आर्वीतील नागरिकांना घेऊन पंढरपूरला घेऊन गेले.

बेलाखडे यांनी आर्वीतील तब्बल ३ हजार नागरिकांना घेऊन पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेतले. तसेच दर्शन घेतल्यानंतर विठुरायाकडे साकडे देखील मागितले. दरम्यान, बेलाखडे यांनी शिंदे सरकारवर चौफेर टीका केली.

Chandrashekhar bavankule
Satara Politics: प्रकाश आंबेडकरांची ‘ती’ कृती म्हणजे ढोंगीपणा; उदयनराजेंची खोचक टीका

बेलाखडे म्हणाले, 'शिंदे सरकार म्हणजे गारुडी असणारे ५० खोक्यांचे सरकर आहे. त्यामुळे असं सरकार जनता घालवून बीआरएस पक्षाचे शेतकऱ्याचे सरकार राज्यात येईल. याबाबत विठुराया चरणी साकडे घातले'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com