विजय पाटील, साम टीव्ही
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या उटगी येथे दोडनाल तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या वतीने जत उमदी रस्त्यावर उपोषण करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मेंढपाळांनी आपल्या मेंढ्या रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभाग घेतला. तब्बल दीड तास हा रस्तारोको करण्यात आल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
जत तालुक्यातील उटगी येथील दोडणाल तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी हे आंदोलन केले आहे.. दोडणाल तलाव हे पूर्णतः हा कोरडे पडले आहे. पाणी सोडतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण अध्यप तलावात सोडले नाही. या तलावातून अनेक गावांना आणि वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र तलाव कोरडे पडले आहे. तलावात सिंचन योजनेचे पाणी त्वरित सोडावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे.
शेजारी सांगोला सोलापूरला पाणी जात आहे. पण कर्नाटकच्या सीमेवरती आपल्याला जत तालुका गावांना पाणी मिळत नाही. तलावात पाणी सोडले जात नाही. हा दुजाभाव कशासाठी कोणत्या नेत्यांनी हा दुजाभाव केला आहे. त्याला आम्ही सोडणार नाही असे संतप्त ग्रामस्थांनी इशारा देत पाणी दिलं नाही. तर कर्नाटक राज्यामध्ये आम्हाला जाण्याची परवानगी द्या असाही इशारा सरकारला ग्रामस्थांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.