Samruddhi Mahamarg : दारू पिऊन वाहन चालवत असाल तर सावधान; समृद्धी महामार्गावर पोलिसांकडून आता तपासणी

Jalna News दारू पिऊन वाहन चालवत असाल तर सावधान; समृद्धी महामार्गावर पोलिसांकडून आता तपासणी
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv
Published On

जालना : समृध्दी महामार्गावरून प्रवास करताना दारू पिऊन वाहन चालवत असल्यास सावधान. (Jalna News) कारण आता समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांची हायवे पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह टेस्ट सुरू करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

Samruddhi Mahamarg
Police Recruitment Exam : त्या १२८ उमेदवारांना स्पर्धा परीक्षेसाठी कायमस्वरूपी बंदी; पोलीस भरती परीक्षेत गैरवर्तन करणाऱ्यांची काळी यादी जाहीर

समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून ही संयुक्त जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. जालन्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर आज पोलिसांनी वाहनं थांबवून ट्रक तसेच इतर वाहन चालकांची ड्रंक अँड ड्राईव्ह टेस्ट घेतली. यात कुणीही दारू पिऊन वाहन चालवताना आढळला नाही. 

Samruddhi Mahamarg
Buldhana News : जीव धोक्यात घालून शिक्षण; पूल नसल्याने विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास

तर होणार कठोर कारवाई 

समृद्धी महामार्गावर हि तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे. यात जर कुणी दारू पिऊन वाहन चालवताना आढळुन आल्यास त्या वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाईल; असा ईशारा हायवे पोलिसांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com