Police Recruitment Exam : त्या १२८ उमेदवारांना स्पर्धा परीक्षेसाठी कायमस्वरूपी बंदी; पोलीस भरती परीक्षेत गैरवर्तन करणाऱ्यांची काळी यादी जाहीर

Pimpri Chinchwad त्या १२८ उमेदवारांना स्पर्धा परीक्षेसाठी कायमस्वरूपी बंदी; पोलीस भरती परीक्षेत गैरवर्तन करणाऱ्यांची काळी यादी जाहीर
Police Recruitment Exam
Police Recruitment ExamSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयसाठी करण्यात आलेल्या २०१९ मधील पोलीस (Police) भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा झाली होती. या परीक्षेदरम्यान आक्षेपाहर्य तसेच गैरवर्तन करणाऱ्या उमेदवारांची काळी यादी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्तांनी जाहीर केली आहे. (Maharashtra News)

Police Recruitment Exam
Ahmednagar News : मुलीची छेड काढल्याने दोन गटात राडा; गावात तणावपूर्ण शांतता

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालासाठी २०१९ मध्ये भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. या भरती प्रक्रिये दरम्यान काही उमेदवारांनी परीक्षेत नकल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर केला होता. तर काही उमेदवारांनी पोलीस भरती लेखी परीक्षेत पास होण्यासाठी इतर काही गैरमार्गांचा वापर केला होता. लेखी परीक्षेत आक्षेपार्य आणि गैरवर्तणूक करणाऱ्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी पिंपरी पोलीस स्टेशन, चिंचवड पोलीस स्टेशन, निगडी पोलीस स्टेशन आणि हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. ह्या सर्व गुन्ह्याचा तपासा करुन जवळपास १२८ उमेदवारांच्या नावाची काळी यादी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जाहीर केली आहे.

Police Recruitment Exam
Buldhana News : जीव धोक्यात घालून शिक्षण; पूल नसल्याने विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास

सर्व समादेशकांना दिले पत्र
राज्यभरातील जवळपास १२८ वर उमेदवारांची नावे काळ्या यादी टाकण्यात आली आहेत. त्यामुळे आता ह्या १२८ उमेदवारांना राज्यातील कोणत्याही पोलीस भरती परीक्षेत तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सहभाग घेण्यासाठी कायमस्वरूपी बंदी आणण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने राज्यातील प्रत्येक पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालय आणि राज्य राखीव पोलीस बलाच्या सर्व समादेशकांना पत्र लिहून या जवळपास १२८ काळी यादी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com