Buldhana News : जीव धोक्यात घालून शिक्षण; पूल नसल्याने विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास

Buldhana News जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी प्रवास; पूल नसल्याने विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील जळगाव आणि पिंपळगाव या गावांच्या मधून एक (Buldhana) नदी वाहत आहे. या नदीवर पूल व्हावा; यासाठी गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही गावातील ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. मात्र अजूनही या नदीवर पूल होत नसल्याने या नदीपात्रातून जीव धोक्यात घालून (Student) विद्यार्थी शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जात आहेत. (Tajya Batmya)

Buldhana News
Jalgaon Crime News : धक्कादायक.. वसतीगृह केअर टेकरकडूनच पाच मुलींचे लैंगिक शोषण; पोलिसच बनले फिर्यादी

जळगाव आणि पिंपळगाव या दोन्ही गावच्या मधून आमना नदी वाहते. जळगावमधील शेकडो विद्यार्थी पिंपळगाव येथील शाळेत शिक्षण घेत आहेत. तर दोन्ही गावांतील ग्रामस्थ (Education) व्यवहार व नातेसंबंध असल्याने नेहमीच ये-जा करतात. एकूणच काय तर या गावांना आमना नदीचे पात्र ओलांडून जावे - यावे लागते. 

Buldhana News
Ahmednagar News : मुलीची छेड काढल्याने दोन गटात राडा; गावात तणावपूर्ण शांतता

पुलासाठी दिली निवेदन 

नदीला पूर आल्यानंतर दोन्ही गावातील नागरिक अडकून पडतात. या नदीवर पूल व्हावा यासाठी गावकरी मोठा प्रयत्न करत आहेत. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनाही या संदर्भात निवेदने देण्यात आले आहेत. परंतु अजूनही हा पूल होत नसल्याने विद्यार्थ्यांना या नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com