जळगाव : एरंडोल तालुक्यात एका गावातील मुलींच्या वसतीगृहातील केअर टेकरनेच पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा (Erandol) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बुधवारी (२६ जुलै) पोलिसांनीच (Police) फिर्याद दाखल केली. गणेश शिवाजी पंडित असे अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एका गावात शासन मान्यता असलेल्या खासगी संस्थेचे मुलींचे वसतीगृह आहे. जून महिन्यात हे वसतीगृह बंद पडल्यानंतर येथे असलेल्या पाच मुलींना जळगावातील शासकीय मुलींच्या निरीक्षण गृहात दाखल करण्यात आले. या मुली त्या ठिकाणच्या वातावरणात रुळल्यानंतर या मुलींनी वसतीगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे खडके येथील वसतीगृहात तेथील केअर टेकरने (Crime News) लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली.
चौघांना अटक
याबाबत जळगाव (Jalgaon) बालकल्याण समिती अध्यक्षानी एरंडोल पोलिसांना पत्र दिले. त्यानुसार या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन एरंडोल पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. सदर वसतीगृह बंद होईपर्यंत म्हणजे वर्षभर मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा केअर टेकर गणेश पंडीत याला अटक करण्यात आली आहे. तसेच माहिती असूनही हे प्रकरण लपवून ठेवून गणेश पंडितला साथ देणारे पत्नी, वसतीगृह अधिक्षिका आणि सचिव यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.