Jalna News: जाफ्राबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; राष्ट्रवादीचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

Jalna News : जाफ्राबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

जालना : यंदा जालन्यासह राज्यात पाऊस कमी झाला आहे. यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाले आहे. यात (Jalna) जालन्यातील जाफ्राबाद तालुक्यात देखील यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने (Jafrabad) जाफ्राबाद तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Maharashtra News)

Jalna News
Garlic Price: कांद्यानंतर लसूणला चढला भाव; किलोमागे इतके पैसे

यंदा पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) नुकसान झाले आहे. उत्पनात देखील घाट झाली असून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या राज्यातील ४० तालुक्यामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. याच अनुषंगाने राज्य सरकारने जाफ्राबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी; अशी मागणी केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalna News
Nandurbar RTO: आरटीओकडून खाजगी ट्रॅव्हल एजन्सीची तपासणी; जास्तीचे भाडे आकारल्यास कार्यवाही

राष्ट्रवादीने काढला मोर्चा 

सदर मागणीसाठी आज राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसिल कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कपाशीला प्रती क्विंटल १० हजार तर सोयाबीनला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com