Garlic Price: कांद्यानंतर लसूणला चढला भाव; किलोमागे इतके पैसे

Latur News: सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यातून आठवड्याला १०० ते २०० क्विंटल लसणाची आयात ही एकट्या लातूर भाजीपाला मार्केटमध्ये
Garlic Price
Garlic PriceSaam tv
Published On

संदीप भोसले

लातूर : होलसेल बाजारासह किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारात (Onion) कांदा ८० रुपये किलो प्रमाणे विक्री होत असताना आता लसूणच्या (Garlic) भाव देखील वाढला आहे. किलोचे दर दीडशे रुपयांच्या जवळ पोहचले आहेत. यामुळे किचनमधील भाजीतील लसणाचा तडका आता महागला आहे. (Breaking Marathi News)

Garlic Price
Ambajogai Goverment Hospital: बीडच्या स्वाराती रुग्णालय औषधांचा तुटवडा; रुग्णांना बाहेरून आणावी लागतेय औषधी

भाजीबाजारात सध्या कांदा आणि लसूण भाव खात आहे. कांद्याचे भाव अगोदरच वाढले असल्याने सर्वसामान्यांना कांदा रडवत आहे. किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. यानंतर आता भाजीपाला मार्केटमध्ये सद्या लसूण भाव खातो आहे. बाजारात (Latur) आवक घटल्याने लसूनाला ११ ते १२ हजार रूपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. यामुळे लसूण उत्पादन करत असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Garlic Price
Bhandara News: २० धान खरेदी केंद्रांना मंजुरी; शासन निर्णय न आल्याने दिवाळी नंतरच खरेदी सुरू

सणासुदीच्या तोंडावर भाव वाढले 

किरकोळ बाजारात लसूण १३०-४० रुपये प्रति किलो भावाने लसणाची विक्री होत आहे. त्यामूळे सर्वसामन्याची रोजची फोडणी महागली आहे. तर सद्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यातून आठवड्याला १०० ते २०० क्विंटल लसणाची आयात ही एकट्या लातूर भाजीपाला मार्केटमध्ये केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com