Ruchika Jadhav
झणझणीत लसूण चटणी जेवणावर अनेक व्यक्ती खातात.
लसूण चटणी बनवण्यासाठी मोठ्या पाकळ्या असलेला लसूण घ्यावा.
एक वाटी लसूण असल्यास आर्धी वाटी खोबरं घ्यावं.
तिखट चविसाठी यात तुम्ही सुकी लाल मिरची टाकावी.
जीरे गॅसवर भाजून घ्यावे आणि ते देखील टाकावे.
त्यानंतर तुमच्या चवीनुसार तुम्ही यात मिठ टाकू शकता.
चटणी बारीक केल्यावर तेल टाकून ती तव्यावर थोडी भाजून घ्यावी.
तयार झाली चमचमीत लसूण चटणी ही चटणी तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता.