Bhandara News: २० धान खरेदी केंद्रांना मंजुरी; शासन निर्णय न आल्याने दिवाळी नंतरच खरेदी सुरू

Bhandara News : धान खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. तर अनेक ठिकाणी नोंदणी बंद असल्याने शेतकन्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे
Bhandara News Dhan Kharedi
Bhandara News Dhan Kharedi Saam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: राज्य शासनाने धान खरेदी करण्याचा नवीन शासन निर्णय घेतला आहे. परंतु हा शासन निर्णय अद्याप भंडारा जिल्ह्यात आला नसल्याने खरेदी केंद्र अद्याप सुरु झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांपुढे समस्या उभी आहे. धान्य येऊन घरात आले असताना विक्री होत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. (Tajya Batmya)

Bhandara News Dhan Kharedi
Sangli News : ऊस तोडणी बंद पाडत कारखान्यात जाणाऱ्या ट्रॅक्टरची सोडली हवा; सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन पेटले

भंडारा जिल्ह्यात धान कापणी व मळणी सुरू होऊन महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लोटत आहे. शासनाने धान खरेदी केंद्राने लावलेले नवीन निकष रद्द करून या खरीप हंगामात जुन्याच निकषानुसार धान खरेदी करण्याचा निर्णय दहा दिवसांपूर्वी घेतला. पण शासनाने शासकीय धान खरेदीला सुरुवात करण्याचा शासन निर्णय अद्यापही जिल्ह्यात पोहचला नाही. परिणामी, धान खरेदीला अद्यापही सुरुवात झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhandara News Dhan Kharedi
Ambajogai Goverment Hospital: बीडच्या स्वाराती रुग्णालय औषधांचा तुटवडा; रुग्णांना बाहेरून आणावी लागतेय औषधी

दिवाळीनंतरच होऊ शकते खरेदी 

शासनाचा धान खरेदी सुरू करण्याचा निर्णय अद्यापही न काढल्याने शेतकरी संभ्रमात आहे. धान खरेदीला अद्यापही सुरुवात झाली नसली; तरी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने २० धान खरेदी केंद्रांना आतापर्यंत मंजुरी दिली आहे. नुकतेच धान खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. तर अनेक ठिकाणी नोंदणी बंद असल्याने शेतकन्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com