Maratha Aarkshan: सरकारची गाढवावरून काढली धिंड; जालन्यात भजन, मुंडन आंदोलन करत चार तासापासून रस्ता रोको

Jalna News : सरकारची गाढवावरून काढली धिंड; जालन्यात भजन, मुंडन आंदोलन करत चार तासापासून रस्ता रोको
Maratha Aarkshan
Maratha AarkshanSaam tv
Published On

जालना : मराठा आरक्षणासाठी मागील आठवड्यापासून पुन्हा एकदा आंदोलन उभारण्यात आले आहे. राज्यात (Jalna) आंदोलन तीव्र झाले असताना सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेतला जात नाही. यामुळे संतप्त सकल मराठा आंदोलकांकडून (Maratha Aarkshan) सरकारचा निषेध करत सरकारची गाढवावरून धिंड काढण्यात आली. (Tajya Batmya)

Maratha Aarkshan
Nanded News : रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल; जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून कुठल्याच प्रकारचा अद्यापही तोडगा निघालेला नाही. सकल मराठा समाजाच्या वतीने मंठ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांचे फोटो गाढवाच्या चेहऱ्यावर लावून राज्य सरकारची धिंड काढत राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Aarkshan
Dondaicha News : बंद घरात धाडसी चोरी; चार लाखांचे दागिने लंपास

चार तासापासून रास्ता रोको 

जालना- परभणी- नांदेड राज्य महामार्गावर भजन, कीर्तन आणि मुंडन आंदोलन करत आहेत. या दरम्यान राज्य महामार्गावर (Maratha Reservation) बैलगाड्या आडव्या लावून गेल्या चार तासापासून रस्ता रोको आंदोलनात सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे गेल्या चार तासापासून राज्य महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे राज्य महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com