Jalna Breaking News : बापाचं संतापजनक कृत्य! आधी पोटच्या पोराला भीक मागायला सांगितलं, नंतर गरम सळईचे चटके दिले

Drunken Father Burned Son For Begging: जालन्यामध्ये एका वडिलांनी मुलाला चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भीक मागून मुलाने पैसे आणावे म्हणून बापाने असं संतापजनक कृत्य केलं आहे.
मद्यपी बापाने दिले पोटच्या लेकरास लोखंडी सळईने चटके
Drunken Father Burned Son For Begging Saam Tv

अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना

जालन्यात मद्यपी वडिलांनी मुलाला लोखंडी सळईने चटके दिल्याची घटना समोर आली आहे. मुलाने भीक मागून पैसे आणण्यासाठी हे धक्कादाक कृत्य केल्याचं समोर आली आहे. ही घटना जालना शहरातील मंगळ बाजार भागात घडली आहे. हा मुलगा सहा वर्षांचा आहे. त्याच्या वडिलांनी त्याला तळहात, पाय अन् संपूर्ण अंगाखाद्यावर सळईने चटके दिले आहेत. अगदी त्याच्या डोक्याच्या भागाला देखील चटके दिल्याचं समोर आलं आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, जालना शहरातील मंगळ बाजार भागात हे बाप-लेक राहात आहेत. परंतु या मुलाच्या वडिलांना दारूचं व्यसन आहे. आपल्या सहा वर्षांच्या मुलाने भीक मागुन पैसे आणावे म्हणून या मुलाच्या बापाने विकृतीचा कळस गाठला (Drunken Father Burned Son) आहे. त्याने आपल्या सहा वर्षाच्या मुलाला लोखंडी सळईने चटके दिले आहेत. या घटनेमध्ये मुलगा चांगलाच जखमी झाला आहे. बापाच्या या कृत्याने चिमुकला घाबरून गेला आहे.

या मुलावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू (Jalna Breaking) आहेत. दरम्यान चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांनी जखमी बालकास भेट देत धीर दिला आहे. या घटनेबाबत सदर बाजार पोलिसांना बालन्याय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत यांनी दिली आहे. या नराधम बापाविरूद्ध कारवाई केली जात आहे.

मद्यपी बापाने दिले पोटच्या लेकरास लोखंडी सळईने चटके
Son killed mother : बायकोसोबत मोबाईलवर बोलताना आई मध्येच बोलली; रागाच्या भरात मुलाकडून धारदार शस्त्राने हत्या

वडिलांनी मुलाला लोखंडी सळईने चटके दिलेत. चाइल्डलाइन जिल्हा बाल सुरक्षा कक्षामार्फत माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे. बालकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू (Crime News) आहेत. तेथील अहवाल प्राप्त होताच असं कृत्य करणाऱ्या वडिलांविरोधात एफआयआर दाखल करू. मिळालेल्या माहितीनुसार मुलाचे वडिल त्याला भीक (Beg) मागण्यासाठी जबरदस्ती करत होते. मुलाने नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती, जालण्याचे बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत यांनी दिली आहे.

मद्यपी बापाने दिले पोटच्या लेकरास लोखंडी सळईने चटके
Johnny Wactor Killed : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं; सिनेसृष्टीत खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com