Yawal Crime News : मस्करीतून उद्भवले भांडण: क्षुल्लक कारणावरून केली हत्या 

Jalgaon News : मस्करीतून उद्भवले भांडण: क्षुल्लक कारणावरून केली हत्या 
Yawal Crime News
Yawal Crime NewsSaam tv
Published On

यावल (जळगाव) : दोघांमध्ये मस्करी सुरु असताना यातून वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर एकाने थेट चाकू हल्ला चढविला. यातून त्याचा मृत्यू झाल्याची घटना (Yawal) यावल येथे घडली आहे. चहाच्या टपरीवर झालेल्या या प्रकारात दुसऱ्यावर लोखंडी सळईने मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. (Maharashtra News)

Yawal Crime News
Crime News: नाशिक पोलिसांची कारवाई; ३०० कोटीपेक्षा जास्त रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त

यावल शहरातील बोरावल गेट परिसरात ६ ऑक्टम्बरला सायंकाळच्या सुमारास धनगरवाडा येथील राहणारे प्रभाकर आनंदा धनगर (वय ५५) व रामा केशव ढाके (रा. व्यासनगर, यावल) यांच्यात थट्टा-मस्करी सुरू असताना त्याचे रुपांतर भांडणात होऊन रामा केशव ढाके याने हातातील चाकूने प्रभाकर धनगर यांच्यावर (Crime News) हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले. धनगर यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. प्राथमिक उपचारानंतर जळगाव येथे मध्यरात्रीनंतर (Police) उपचारादरम्यान धनगर यांचा मृत्यू झाला. याबाबत प्रभाकर धनगर यांचे भाऊ अशोक आनंदा धनगर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रामा ढाके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yawal Crime News
Gondia Crime News : महादेव मंदिरातून चोरी; गोंदिया पोलिसांकडून दोघांना अटक

परस्परविरोधी गुन्हे दाखल
दरम्यान, याच प्रकरणी आशा रामा ढाके (वय ५०, रा. देशमुखवाडा, यावल) यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीत म्हटले आहे, की पती रामा केशव ढाके हे बोरावल गेट परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे असताना संशयित आरोपी प्रभाकर आनंदा धनगर याने रामा ढाके यांना अश्लील शिविगाळ करीत लोखंडी सळईने फिर्यादीचे पती यांना डोक्यावर, हातापायावर मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुजफ्फर खान या दोन्ही घटनांचा पुढील तपास करीत आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com