वरणगाव (जळगाव) : हतनूर (ता. भुसावळ) येथील शेतशिवारात वास्तव्यास असलेल्या पती- पत्नीमध्ये वाद होत होते. (Bhusawal) दरम्यान सोमवारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या (Crime News) केल्याची घटना सोमवारी (१८ सप्टेंबर) पहाटे घडली. यामुळे घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वरणगाव पोलिसांनी पतीला अटक केली आहे. (Breaking Marathi News)
उत्तरप्रदेश राज्यातील राजकिशन कॉलनी शक्तीनगर (जि. सोनभद्र) येथील जितेंद्र गंगाराम हेमब्रम व शांताबाई हे दाम्पत्य आहे. ते एका शेतकऱ्याकडे कामाला असल्याने जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील शेतशिवारात जितेंद्र हेमब्रम हा पत्नी शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम सोबत या ठिकाणी वास्तव्यास आहे. शेतातील घरात हे दांपत्य राहात असून, या दोघांमध्ये रात्री वाद झाला. या वादावेळी पती जितेंद्र याने दारूच्या नशेत पत्नी शांतादेवी हिला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचा गळा आवळल्याने शांतीदेवी हिचा जागीच मृत्यू झाला.
पतीला घेतले ताब्यात
घटनेची माहिती वरणगाव (Varangaon) पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे साक्षीदार व मृत शांतादेवी यांनी संशयित पतीची दारू पिल्याने त्याचा पतीला राग आल्याच्या कारणावरून घटना घडल्याचे समोर आले आहे. पत्नीचा मारेकरी जितेंद्र यास पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. शांतीदेवी यांचा मृतदेह पोलिसांनी तपासणीसाठी पाठविला आहे. वरणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार आडसूळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी, किशोर पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.