Jalgaon Politics: खान्देशात भाजपची ताकद वाढणार, खडसे-महाजन येणार एकत्र? पडद्यामागं काय घडतंय?

Raksha Khadse Talk On Mahajan And Eknath Khadse: लोकसभा निवडणुकीत खानदेशात भाजपला विजय मिळाल्यानंतर तेथील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातवारण आहे. तेथील पक्षाला बळ देण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी कंबर कसली असून जळगावमधील दोन मोठे नेते एकत्र आणण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत.
Jalgaon Politics: खान्देशात भाजपची ताकद वाढणार, खडसे-महाजन येणार एकत्र? पडद्यामागं काय घडतंय?
Raksha Khadse Talk On Mahajan And Eknath Khadse
Published On

जळगाव जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीत खान्देशात जागा जिंकल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय.दरम्यान भाजपमधील अंतर्गत वादामुळे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार आहेत.

आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा नाथाभाऊंनी तीन ते चार महिन्या आधीच केलीय. मात्र अद्याप एकनाथ खडसेंना भाजप प्रवेश झाला नाहीये. त्यामागे खडसे आणि गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादामुळे नाथाभाऊचा प्रवेश रखडल्याचं सांगितलं जात आहे.

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे निवडून आल्यात. इतकेच नाहीतर मोदींच्या कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी सुद्धा लागलीय. त्यानंतर रक्षा खडसे आता जोमाने कामाला लागल्यात. पक्षाला बळकटी देण्यासाठी त्यांनी कंबर कसलीय. त्या दृष्टीने त्या काम करताना त्यांनी प्रथम एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात समेट घडवून आणणार आहेत.

जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. नाथाभाऊ मोठे नेते आहेत, त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतीलच, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिलीय.

एकनाथ खडसे यांचा प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील. आणि योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. माझी इच्छा आहे की, भारतीय जनता पार्टी सोबत जेवढे लोक जोडतील तेवढ्या आमच्या पक्षाची ताकद वाढेल. नाथाभाऊ हे भाजपमधील खूप जुने नेते आहे, त्यामुळे गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ यांनी एकत्र येऊन काम केलं तर जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलंच आहे. नाथाभाऊ आणि गिरीश भाऊ यांना एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल, गेल्या चार-पाच वर्षापासून मी या दोघांचा संघर्ष बघत आलेली आहे परंतु माझी देखील प्रामाणिक इच्छा असल्याचं, रक्षा खडसे म्हणालेत.

Jalgaon Politics: खान्देशात भाजपची ताकद वाढणार, खडसे-महाजन येणार एकत्र? पडद्यामागं काय घडतंय?
Maharashatra Election: नरेंद्र मोदींच्या माध्यमातून समाजामधील सर्व घटकांना लाभ मिळाला: रक्षा खडसे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com