Jalgaon Political News
Jalgaon Political NewsSaam tv

Jalgaon Political News: खडसेंनी आता उभे राहून एकदा निवडून दाखवावं; गिरीश महाजन यांचा निशाणा

Jalgaon News : एकनाथ खडसे यांनी लोकसभेला उभा राहील असे म्हटले आहे. पण लोकसभेला एकनाथ खडसेंनी उभे राहावं आणि निवडून येऊन दाखवावं.
Published on

जळगाव : एकनाथ खडसेंनी उगाच तोंडाच्या वाफा सोडू नये मतदार संघात एकदा निवडून या. निवडणुका (Jalgaon) जवळ आहेत. एकनाथ खडसेंनी लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहावे; म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं आहे आणि यश कोणाचा आहे; अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.  (Breaking Marathi News)

Jalgaon Political News
Manoj Jarange Patil News: आरक्षण दिलं नाही, तर २० जानेवारीला मराठे काय असतात हे दिसेल; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी लोकसभेला उभा राहील असे म्हटले आहे. पण लोकसभेला एकनाथ खडसेंनी उभे राहावं आणि निवडून येऊन दाखवावं. माझा लोकसभा उमेदवारीचा कुठलाही विचार नाही आहे. (Jalgaon Political News) माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी केली आहे. मी आमदार आहे आमदार म्हणूनच राहणार. पक्ष जो आदेश देईल, तो पालन करेल. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Political News
Hingoli News : कापसाची स्वस्त दरात करावी लागतेय विक्री; हिंगोलीत खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण

मला सत्तेचा हाव नाही 

पक्षाने सांगितलं आमदारकीत नाही राहायचं तर मी दुसऱ्या कामात राहील परिवाराच्या कामा ठिकाणी मी जाईल. मला सत्तेची हाव नाही. इकडे पडलो की इकडे तिकडे चोऱ्यामाऱ्या कर. असा उद्योग मी करत नाही. मी संघाचा सेवक आहे व पक्षाचा शिलेदार आहे बाकी त्यांना त्यांचं लक लाभ; असेही महाजन म्हणाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com