Jalgaon News : विहीरीत पोहण्याचा मोह आला अंगलट

Jalgaon News : विहीरीत पोहण्याचा मोह आला अंगलट
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : सकाळी उठल्यावर फिरायला गेला. यावेळी गावापासून जवळ असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या सुभाषवाडी (ता. जळगाव) येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पवन भिका जाधव (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

Jalgaon News
Anandraj Ambedkar: भांडवल करणारे करत आहेत; बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत आनंदराज आंबेडकर यांच्या अप्रत्यक्षपणे टोला

पवन जाधव हा मिस्त्री काम करून कुटुंबाचा (Jalgaon) उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान शनिवारी सकाळी उठल्यावर तो नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडला व गावातील एका विहिरीजवळ आला. तेथे त्याला (Drowned) पोहण्याचा मोह झाल्याने तो, विहिरीत उतरला. मात्र, पोहताना तळाशी जावून बुडाला. हि घटना गावातील काहींनी पहिली होती. यामुळे बातमी गावात समजली. 

Jalgaon News
Wardha News : चहा, पकोडे व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोखे आंदोलन; कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्याची मागणी 

याबाबत ग्रामस्थांना कळताच त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावले. त्यांनी मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पवनच्या मागे आई-वडील, २ भाऊ, २ विवाहित बहीणी असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com