जळगाव : पाणी भरत असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील आसोदा बाबत घडली. खंडित झालेला वीज प्रवाह अचानक आल्याने सकाळी हि घटना घडली आहे.
जळगाव (Jalgaon) तालुक्यातील आसोदा येथील संगिता मच्छिंद्र कुंभार (वय ४०) असे सदर घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. संगीत कुंभार या आज सकाळी नळाला पाणी आले असल्याने ईलेक्ट्रीक मोटार लावून पाणी भरत होत्या. मात्र मोटारीने पाणी भरताना काही वेळाने विद्युत पुरवठा खंडीत झाला. यामुळे मोटारीचे बटन बंद करण्यासाठी त्या घरात गेल्या.
संगिता कुंभार यांनी बटन बंद करण्यासाठी गेल्या असतानाच विद्युत पुरवठा सुरू झाला. यामुळे त्यांना विजेचा जोरदार झटका (Electric Shock) बसला. यात त्या जोरात फेकल्या जाऊन पडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटनेनंतर पती मच्छिंद्र कुंभार व ग्रामस्थांनी त्यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषीत केले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.