पारोळा (जळगाव) : शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी या चिंतेत असलेल्या शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. हि घटना पारोळा तालुक्यातील भोलाणे येथे घडली आहे.
भोलाणे (ता. पारोळा) येथील शेतकरी भागवत रघुनाथ पाटील (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. भागवत पाटील यांनी शेतीसाठी सोसायटी व हात उसनवारीचे कर्ज घेतले होते. मात्र शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यामुळे डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे तसेच हाटूसन्वरीने घेतलेले पैसे परत कसे द्यायचे याची चिंता त्यांना होती. याच विवंचनेत त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
उपचारादरम्यान मृत्यू
भागवत पाटील यांनी भोलाणे शिवारात असलेल्या शेतात २२ जूनला काहीतरी विषारी द्रव्ये सेवन केले. हा प्रकार कुटुंबियांच्या (Farmer) लक्षात आल्याने त्यांना पारोळा कुटीर रुग्णालय नेट प्रथमोपचार करून धुळ्याच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान उपचारादरम्यान २३ जूनला त्यांचा सकाळी मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.