Ahmednagar News : महिलांचा रुद्रावतार; गावातील अवैध व्यवसायांवर हल्लाबोल

Ahmednagar News : अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील कोल्हार भगवती गावात मोठ्या प्रमाणात जुगार, मटका, खुलेआम गांजा विक्री सुरू होती.
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv

सचिन बनसोडे 

कोल्हार (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार गावामध्ये संतप्त महिलांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात रुद्रावतार दाखवला. पोलिसांना अनेकदा निवेदन देऊनही अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याने आक्रमक झालेल्या महिलांनी जुगार मटक्याच्या दुकानाची तोडफोड केली.

Ahmednagar News
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात ३५ कृषी केंद्राचे परवाने रद्द; कृषी विभागाकडून २ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगरच्या (Ahmednagar) राहाता तालुक्यातील कोल्हार भगवती गावात मोठ्या प्रमाणात जुगार, मटका, खुलेआम गांजा विक्री सुरू होती. या विरोधात अनेकदा पोलीसांना निवेदन देण्यात आले होते. मात्र निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्याने लहुजी शक्तीसेना, आदिवासी एकलव्य संघटना आणि दुर्गा वहिनीच्या महिलांनी आपला मोर्चा अवैध व्यवसायावर वळवला आणि दुकानांची तोडफोड करत मटक्याच्या कागदांची होळी केली. 

Ahmednagar News
Nagpur Crime : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी; सोशल मीडियावरील मित्राचे कृत्य

तीव्र आंदोलनाचा इशारा 

अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून गावात दादागिरी वाढली असून अनेकदा मारहाणीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गावातील सर्व अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद केले नाही; तर आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महिलांनी दिला. मात्र गावात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com