Jalgaon Electric Shock
Jalgaon Electric ShockSaam tv

कट झालेल्‍या वायरीला लागला हात; तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

कट झालेल्‍या वायरीला लागला हात; तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
Published on

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील पिलखोड गावात विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १५) दुपारी घडली आहे. वेल्‍डींगच्‍या दुकानात कामाला गेला असताना कट झालेल्‍या वायरीला धक्‍का (Electric Shock) लागल्‍याने युवकाचा मृत्‍यू झाला. (Jalgaon News Electric Shock)

Jalgaon Electric Shock
नवापूर तालुक्यात धो धो, पूर्व पट्ट्यात मात्र पावसाने फिरवली पाठ; पावसासाठी काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील पिलखोड येथील रवींद्र सुरेश भिल्ल (वय २५) हा कुटुंबासह वास्तव्याला असून, गेल्या दोन महिन्यांपूर्वीच तो विवाहबद्ध (Marriage) झाला होता. आई-वडील ऊसतोडणीचे कामे तर रवींद्र हा दुसऱ्याच्या वेल्डिंगच्या दुकानावर कामाला जायचा. यातून आलेल्या पैशातून ते परिवाराची उपजीविका भागवीत असत.

वायरीला धक्‍का लागताच फेकला गेला

दरम्यान, रवींद्र आज तामसवाडी रोडवरील वेल्डिंगच्या दुकानावर कामाला गेला होता. तेव्हा कट झालेल्या वायरला हात लावताच त्याला शॉक लागला व तो खाली कोसळला. त्यानंतर लागलीच त्याला स्थानिक नागरिकांनी खासगी रुग्णालयात नेण्यासाठी एका वाहनाने घेऊन जात असताना अर्ध्या रस्त्यात त्याची प्राणज्योत मावळली. या घटनेने भिल्ल कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, सदर मृतदेहला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात अजून नोंद करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com