Ramdas Athawale News: मुंबईची हवा खावी व उमेदवार निश्चित करावा; रामदास आठवले यांचा टोला

Jalgaon News : मुंबईची हवा खावी व उमेदवार निश्चित करावा; रामदास आठवले यांचा टोला
Ramdas Athawale News
Ramdas Athawale NewsSaam tv
Published On

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सर्व विरोधक मुंबईत एकवटले आहेत. विरोधकांनी मुंबईची हवा खावी, समुद्र पहावा (Jalgaon News) आणि पंतप्रधानपदाचा एखादा उमेदवार निश्चित करावा; असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे. (Tajya Batmya)

Ramdas Athawale News
Amravati News : आठ दिवसांपासून शेतात वीज नाही; वीज कार्यालयावर ठिय्या आंदोलन

मुंबईत आज होणाऱ्या बैठकीवर बोलताना रामदास आठवले यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात किती पक्ष वाढवायचे तेवढे विरोधकांनी वाढवावेत. रिपाइं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी असणार असल्याचे ठाम मत त्यांनी यावेळी मांडले. 

Ramdas Athawale News
Municipal Commissioner Residence : महापालिका आयुक्त निवासस्थानाची शहरभर चर्चा; वास्तूदोषाचा विषय येतोय समोर, आयुक्त कार्यालयाकडून मात्र इंकार

कितीही दंड थोपटले तरी आमचीच सत्ता 

इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक यासह असंख्य कामे एनडीए सरकारने केली आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही दंड थोपटले तरी २०२४ मध्ये पुन्हा केंद्रात आमची सत्ता येऊन नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान होतील असा दावाही रामदास आठवले यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com