Jalgaon News: कामावरून घरी आल्‍यावर मुलीला पाहून आईला बसला धक्‍का

कामावरून घरी आल्‍यावर मुलीला पाहून आईला बसला धक्‍का
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : शहरातील शिवकॉलनी परिसरातील बारावीच्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिशा विठ्ठल नाईक असे मृत (Student) विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. (Letest Marathi News)

Jalgaon News
Samruddhi Highway Rules: समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे नियम धाब्यावर; उल्लंघन केलेल्या ६१३ प्रकरणांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई

जळगाव शहरातील श्री अपार्टमेंटमध्ये दिशा विठ्ठल नाईक (वय १७) आईसह वास्तव्यास होती. दिशा हिची आई (Zilha Parishad) जिल्हा परिषदेत (अनुकंपावर) नोकरीला असून, नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या होत्या. शुक्रवारी दिशा घरी एकटी असताना तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सातला आई घरी आल्यावर तिला घरात दिशा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळताच त्यांनी आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर (Police) पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी दिशा नाईक हिला मृत घोषित केले. दिशा जळगाव शहरातील एका महाविद्यालयात बारावीला शिक्षण घेत होती. दिशाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर मोठा भाऊ पुण्यात शिक्षण घेत आहे. याबाबत डॉ. दीपक जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून रामानंदनगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक अजित पाटील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com