Samruddhi Highway Rules: समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे नियम धाब्यावर; उल्लंघन केलेल्या ६१३ प्रकरणांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई

नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्गावर ११ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान समृद्धी महामार्गावर तब्बल ६१३ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.
Samruddhi Highway Rules
Samruddhi Highway RulesSaam TV

Samruddhi Highway Rules: समृद्धी महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उलंघन होत आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. या ठिकाणी वेगमर्यादा दिलेल्या आहेत. मात्र अनेक व्यक्ती हे नियम मोडून सुसाट वाहने पळवत आहेत. नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्गावर ११ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान समृद्धी महामार्गावर तब्बल ६१३ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. या व्यक्तींनी नियम मोडून सुसाट वाहने चालवल्याने त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आली आहे. अशात वाहतूक पोलीस सातत्याने वेग मर्यादेच्या नियमांचे पालन करण्यास सांगत आहेत मात्र मर्यादा ओलांडणाऱ्यांवर आळा घालण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ( Latest Speed ​​limit Samruddhi Highway Rules News)

वेग मर्यादेचे नियम

नागपूर - शिर्डी असा प्रवास करताना नागरिकांना फार वेळ लागत होता. अशात नागपूर - शिर्डी महामार्गाने हा प्रवास फक्त ५ तासांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. मात्र तरी देखील अनेक व्यक्ती घाई करत वेगमर्यादा मोडत आहेत. ११ डिसेंबर पासून समृद्धी महामार्ग वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला. यात अवजड वाहनांसाठी ८० किलोमीटर प्रतितास तर हलक्या वाहनांसाठी १२० किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा दिली आहे. ही वेगमर्यादा न पाळल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या ५० च्या पुढे पोहचली आहे.

Samruddhi Highway Rules
Samruddhi Mahamarg : आलीशान गाड्या, बंगले, अन् रग्गड पैसा! समृद्धी महामार्गाने शेतकरी झाले मालामाल

समृद्धी महामार्गावर नागरिक मर्यादेचे उल्लंघन करत प्रतितास १५५, १५१ अशा वेगाने वाहने चालवत आहेत. काही व्यक्तीतर प्रतितास १६० किलोमीटर वेगाने देखील आपली वाहने पळवताना दिसले आहेत. या सर्वांना आळाघालणे महत्वाचे असल्याने आता वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी कंबर कसली आहे. ६१३ जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. कारवाई सुरू असूनही अनेक जण नियमांना केराची टोपली दाखवताना दिसत आहेत.

Samruddhi Highway Rules
Accident News : समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

वेग मर्यादा न पाळणाऱ्यांकडून आतापर्यंत १२ लाख २६ हजार रुयांची दंड वसुली करण्यात आली आहे. यात नो पार्कींगमध्ये वाहने उभे केलेल्या आणि अन्य नियम मोडलेल्या १७३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसचे सीटबेल्ट लावले नसल्याने ७८ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे आहे. यात मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेटची सक्ती आहे. मात्र हेल्मेट न वापरणाऱ्या एकूण ३० व्यक्तींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com