जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या जळगाव शहर मतदारसंघात रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवाराच्या घरावर आज भल्या पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या घटनेचा पसंत करण्यास सुरवात करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांकडून प्रचार व गाठीभेटी घेण्यावर अधिक भर आहे. दरम्यान (Jalgaon) जळगाव शहर मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांसह तब्बल २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामुळे चुरस अधिक वाढली आहे. यातच आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरातील मेहरूण परिसरात आज अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.
अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. अहमद हुसेन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठीत नागरिक देखील घटनास्थळी हजर झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा संपूर्ण पंचनामा केला असून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे. अपक्ष उमेदवाराला पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.