जळगाव : मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्यात येत असल्याचे महावितरणने केलेल्या तपासणीत आढळून आले होते. मात्र या वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या महावितरणच्या दोन वायरमनांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.
महावितरणचे वायरमन सचिन ऊर्फ गोटू भागवत सपकाळे, धनराज सुभाष सपके अशी ताब्यात घेतलेल्या दोघांचे नावे आहेत. महावितरणचे पथक वीजचोरी विरोधात कारवाई करण्यासाठी मीटरची तपासणी करत होते. याच दरम्यान २ डिसेंबरला वीज कंपनीच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली असता. मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याचे आढळून आले. अशी पाच वीज मीटर काढून घेतली होती.
दीड लाख रुपयांची मागणी
यामध्ये वीजमिटरमध्ये छेडखानी करून ते बंद पाडले आहेत. ती मीटर नादुरुस्त असल्याचे सांगून तुमच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल, तर दीड लाख रुपये द्यावे लागेल, अशी मागणी वायरमन सचिन सपकाळे व धनराज सपके यांनी केली. मात्र तडजोडी अंती एक लाख रुपये देण्याचे तक्रारदाराने मान्य केले. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
एसीबीने घेतले ताब्यात
ता तक्रारीची दाखल घेत जळगाव एसीबीच्या पथकाने शहानिशा केली असता यात तथ्य आढळून आले. त्यावरून एसीबीच्या पथकाने ३१ डिसेंबरला कारवाई केली. या वेळी लाच स्वीकारल्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले असून लाच मागणाऱ्या दोन वायरमनांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.