Shirdi Sai Baba : सर्वसामान्य साईभक्तांना मिळणार व्हीआयपी आरतीचा लाभ; साई मंदिर संस्थानचा नवा उपक्रम

Sai Baba Temple : पंढरपुरच्या आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या धर्तीवर संस्थानकडून भाविकांसाठी नव वर्षाची नवी भेट दिली आहे यात सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या साईभक्तांना व्हिआयपी आरतीचा लाभ देण्यात येणार
Shirdi Sai Baba
Shirdi Sai Baba Saam tv
Published On

सचिन बनसोडे 
शिर्डी (अहिल्यानगर)
: शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. अनेक भाविक व्हीआयपी पास घेऊन दर्शन घेत असतात. तर बहुतांश भाविक सामान्य दर्शन रांगेतून दर्शन घेतात. अशा भाविकांसाठी साई मंदिर संस्थानने नवा उपक्रम सुरु करत सामान्य दर्शन रांगेतील भाविकांना व्हीआयपी आरतीचा लाभ दिला जाणार आहे. या उपक्रमाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.   

शिर्डीच्या साईबाबांचा भाविक वर्ग मोठा आहे. देश- विदेशातून भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. यामुळे साई मंदिरात भाविकांची गर्दी मोठी असते. याकरिता साई मंदिर संस्थांकडून नियमित दर्शन रांगेसोबत व्हीआयपी दर्शन सुविधा सुरु केली आहे. या व्हीआयपी दर्शन रांगेसाठी असलेली पास घेत अनेक भाविक दर्शन घेत असतात. मात्र आता नविन वर्षाच्या पार्श्वभुमीवर साईबाबा मंदिर संस्थानने सामान्य दर्शन रांगेतील भाविकांसाठी नवा उपक्रम सुरु केला आहे. 

Shirdi Sai Baba
Jalna Accident : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबावर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू, उभ्या ट्रकला कार धडकून भीषण अपघात

दोन भाविकांना मिळणार आरतीचा लाभ 

पंढरपुरच्या आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या धर्तीवर संस्थानकडून भाविकांसाठी नव वर्षाची नवी भेट दिली आहे. यात सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या साईभक्तांना व्हिआयपी आरतीचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या पहिल्या दोन भाविकांना व्हिआयपी आरतीचा मान दिला जाणार आहे. आजपासून याची सुरवात झाली असून झाशी येथील मनिष रजक आणि त्यांची पत्नी पुजा रजक हे दांम्पत्य नवीन वर्षाच्या पहिल्या आरतीचे मानकरी ठरले आहेत. आरतीचा मान मिळाल्यानंतर रजक दाम्पत्य भावूक झाले होते. 

Shirdi Sai Baba
Bus Service : स्वातंत्र्यानंतर गडचिरोलीच्या १५ गावांमध्ये बस सेवा; गावकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी केला प्रवास

साई समाधी जवळ उभे राहून करता येणार आरती 

दरम्यान यापुर्वी फक्त सशुल्क पास धारक तसेच दानशूर भाविक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तिंनाच हि संधी मिळत होती. मात्र सामान्य भाविकाला देखील आता अतिमहत्त्वाच्या व्यक्तीनुसार सन्मान देत थेट साई समाधीजवळ उभे राहून आरती करता येणार आहे. दिवसभरातील मध्यान्ह आरती, धुप आरती आणि रात्रीच्या शेजारतीमध्ये हि संधी मिळणार आहे. 

साईभक्तांकडून रात्री बाराला जल्लोषात नववर्षाचे स्वागत
शिर्डीत नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. मंदिराच्या दर्शनरांगांसह साई मंदिर परिसरात भाविकांनी तोबा गर्दी केली होती. मध्यरात्री बारा वाजता साईभक्तांनी एकत्र येत जल्लोष करत साई नामाच्या जयघोषाने नवीन वर्षाचे स्वागत केले. नवीन वर्षाचे स्वागत साई दरबारी करता यावे म्हणून देश विदेशातून साईभक्त शिर्डीत दाखल झाले. मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी आणि वाद्याच्या तालावर नृत्य करत साईभक्तांनी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले. दरम्यान काल रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्याने मोठ्या संख्येने साई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com