‘व्हॅलेंटाइन डे’ला प्रेमीयुगल फुर्रर्र..तिकडे मुलाच्या आईला पेटविण्याचा प्रयत्न

‘व्हॅलेंटाइन डे’ला प्रेमीयुगल फुर्रर्र..तिकडे मुलाच्या आईला पेटविण्याचा प्रयत्न
crime
crimesaam tv
Published On

जळगाव : ‘व्हॅलेंटाइन डे’ला सिंधी कॉलनीतील तरुण- तरुणीने लग्नसाठी घरून पळ काढला. मात्र, मुलीला पळवून नेल्याचा आरोप करत मुलीच्या कुटुंबीयांनी थेट मुलाच्या घरावर हल्ला चढवून त्याच्या आईच्या अंगावर पेट्रोल (Petrol) टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत (Police) गुन्हा दाखल झाला आहे. (jalgaon news crime Attempt to set fire to the boy mother on Valentine's Day)

crime
दुर्दैवी : शतपावली करणाऱ्या दोन शिक्षिकांवर काळाचा घाला; भरधाव कारने दोघींना चिरडलं

सिंधी कॉलनीतील रहिवासी आशा अशोक तलरेजा (वय ५५, रा. घर क्रमांक १८४) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सिंधी कॉलनीतीलच रहिवासी अंजल शंकर राजपाल यांच्या मुलीला (Valentine Day) आशा तलरेजा यांच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा राग डोक्यात ठेवून दुपारी एकच्या सुमारास राजपाल कुटुंबीय त्यांच्या घरी आले व त्यांनी ‘दोन तासांत आमची मुलगी सुखरूप घरी आणून दे, नाहीतर अंगावर पेट्रोल ओतून तुला जाळून टाकू,’ अशी धमकी दिली होती. मात्र, दोघेही तरुण-तरुणी नेमके कुठे गेले, याची माहिती नसल्याने व मुलाशी संपर्कही (Jalgaon News) नसल्याचे वारंवार आशा तलरेजा यांनी सांगितले. मात्र, समोरची मंडळी काहीएक न ऐकता धमकी देत गोंधळ घालून निघून गेले.

फोन लावून मुलाला बोलव म्‍हणत टाकले पेट्रोल

दोन तासांत मुलगी आणून द्या, असे दुपारी धमकावून गेल्यानंतर सायंकाळी पावणेसातच्या सुमारास चेतन सर्वानंद राजपाल, राजेश सर्वानंद राजपाल, मुन्ना सर्वानंद राजपाल, अंजू शंकर राजपाल, करू मुन्ना राजपाल यांनी हातात लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांसह पेट्रोल कॅन घेऊन आशा तलरेजा यांच्या घरावर धडक दिली. शिवीगाळ करून मुलीची आई रिया हिने मारहाण करून ‘आताच्या आता फोन लावून तुझ्या मुलाला बोलव,’ असे म्हणत सर्वांनी मारहाण सुरू केली. ‘तू अशी ऐकणार नाहीस’ असे म्हणत मुन्ना राजपाल याने हातातील कॅनमधील पेट्रोल आशा तलरेजा यांच्या अंगावर ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. वेळीच परिसरातील रहिवाशांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. जखमी आशा तलरेजा यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी (ता. १५) सायंकाळी त्यांचा जबाब नोंदवून एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com