जळगाव : जिल्ह्यातील लसींचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने लसीकरण केंद्रे लशींअभावी बंद आहेत. अनेक नागरिकांना सोमवारी सकाळीच हजर राहूनही लस न घेताच परतावे लागले. लसींच्या साठ्याअभावी गेल्या तीन दिवस पासून लसीकरण बंद असल्याने नागरिकांना लस घेण्याची प्रतीक्षा होती. मात्र ३२ हजार लसींचा साठा उपलब्ध झाल्याने आज केंद्रावर गर्दी होती. (jalgaon-news-corona-vaccines-shortage-vaccines-stopped-and-cetner-closed)
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता कोरोनाची लस घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. लसीचा दुसरा डोस कसातरी उपलब्ध होत आहे. मात्र पहिला डोसच बाकी असलेल्या नागरीकांना मात्र प्रतिक्षाच करावी लागत आहे. लसींचा साठाच पुरेसा उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. मात्र ज्यावेळी साठी उपलब्ध झाला; त्यावेळी केंद्रावर लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.
७३ सेंटरच सुरू
कोरोना लसीकरणाचे जिल्ह्यात १७७ केंद्र आहेत. यापैकी केवळ ७३ केंद्रच आजच्यास्थीतीला सुरू आहेत. उर्वरीत १०४ केंद्र लसीच्या साठ्याअभावी बंद ठेवावी लागली आहेत. यामुळे सुरू असलेल्या ७३ केंद्रांवर लसीकरणासाठी नागरीकांची सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
३२ हजार लसी उपलब्ध
तीन दिवसांपासून केंद्र बंद होती. मात्र सोमवारी (ता.१६) जिल्ह्यात कोविशिल्डच्या ३२ हजार व कोव्हॅक्सीनच्या १६ हजार लसींचा साठा उपलब्ध झाल्याने रविवारी त्या लसी वाटप करण्यात आल्या. यात जळगाव मनपाला कोविशिल्ड ५०० व कोव्हॅक्सीनच्या ५०० लस तर जिल्हा रूग्णालयास कोविशिल्डच्या १ हजार व कोव्हॅक्सीनच्या ५०० लस देण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.