पेट्रोल भरण्यासाठी जातात गुजरात राज्‍यात; दरातील तफावतीविरोधात आंदोलन

पेट्रोल भरण्यासाठी जातात गुजरात राज्‍यात; दरातील तफावतीविरोधात आंदोलन
Petrol price hike
Petrol price hike
Published On

नंदुरबार : पेट्रोल– डिझेलचे दर रोजच वाढत आहे. राज्‍यात हे दर अधिक असून, पेट्रोलच्‍या दरात आठ रूपयांची तफावत असल्‍याने वाहन धारक महाराष्‍ट्राची सीमा ओलांडून गुजरातमध्‍ये पेट्रोल भरण्यासाठी जात आहे. दोन राज्‍यातील दरामधील या तफावतीच्‍या विरोधात पीपल रिपब्लिकन पार्टीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. (nandurbar-news-petrol-price-hike-republic-party-Go-to-Gujarat-to-fill-up-petrol)

राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यात आज १०८ रुपये दराने पेट्रोल मिळत आहे. तर डिझेलचे भाव देखील शंभरच्या जवळ येत आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडर देखील ९०० रुपयेपर्यंत पोहचला असल्यामुळे याच्या सर्व परिणाम नागरिकांवर होत आहे. मात्र केंद्र सरकार या गोष्टींची दखल घेताना दिसत नाही.

गुजरातमध्‍ये टाकी फुल्‍ल

नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवर असलेला जिल्हा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक गुजरात राज्यात पेट्रोल भरण्यासाठी जात असतात. महाराष्ट्रापेक्षा आठ रुपये कमी किंमतीने पेट्रोल हे गुजरात राज्यात मिळत असल्यामुळे असा भेदभाव केला जात असल्याने त्याच्या निषेधार्थ पीपल रिपब्लिकन पार्टीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

Petrol price hike
मध्‍य रेल्वेचा पंधरा वर्षातील नवा रेकॉर्ड; भंगार विक्रीतून कमावले इतके कोटी

धक्‍का मार आंदोलन अन्‌ एक लिटर पेट्रोल

शहादा शहरातील डोंगरगाव चौफुलीपासून तर भाऊ पेट्रोल पंपपर्यंत मोटरसायकलींना धक्का मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जो व्यक्ती पहिले येणार त्याला एक लिटर पेट्रोल आणि पुष्पहार अर्पण करून मोटरसायकलच्या सत्कार करून केंद्र सरकारच्या निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com