Bribe Trap : वीज बिलाच्या दंडाच्या रकमेत तडजोडीसाठी घेतली लाच; १ लाख स्वीकारताना वायरमन ताब्यात

Jalgaon News : जळगाव शहरातील ५३ वर्षीय तक्रारदाराच्या घराचे बांधकाम पूर्ण झाले होते. नवीन घरासाठी वीज कनेक्शन जोडण्याकरिता मीटरसाठी अर्ज केला होता.
Jalgaon Bribe Trap
Jalgaon Bribe TrapSaam tv
Published On

जळगाव : महावितरणने आकारलेल्या दंडाच्या रकमेत तडजोड करून देण्याचे सांगून पैशांची मागणी केली. (Jalgaon) या दरम्यान तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना जळगाव शहरात महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन असलेल्या कर्मचाऱ्याला एसीबीने ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

Jalgaon Bribe Trap
Anganwadi Sevika Strike: अंगणवाड्यांना टाळं, सेविकांचे मुळशी पंचायत समितीवर साखळी आंदोलन

महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन प्रशांत विकास जगताप (वय ३३) असे ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. जळगाव शहरातील ५३ वर्षीय तक्रारदाराच्या घराचे बांधकाम पूर्ण झाले होते. नवीन घरासाठी वीज कनेक्शन जोडण्याकरिता मीटरसाठी अर्ज केला होता. परंतु अद्याप मीटर बसऊन मिळाले नव्हते. दरम्यान त्यांच्या घराला महावितरणच्या (MSEDCL) पथकाने भेट देऊन त्यांना ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली, तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Bribe Trap
Bhandara News : कंटेनरमधून ४० गोवंशाची सुटका; जुने व नवीन गोवंश तस्कर पुन्हा सक्रिय, साकोली पोलीसांची कारवाई

प्रकरण दाबण्यासाठी दीड लाखाची मागणी 

तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता १ लाख ६० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो; असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचासमक्ष १ लाख रुपये रोजी (ACB) स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. प्रशांत जगताप यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com