Bhandara News
Bhandara NewsSaam tv

Bhandara News : कंटेनरमधून ४० गोवंशाची सुटका; जुने व नवीन गोवंश तस्कर पुन्हा सक्रिय, साकोली पोलीसांची कारवाई

Bhandara News : अवैध धंदे करणारे तस्कर वेगवेगळी शक्कल लढवून तस्करी करीत आहेत. पोलीस यंत्रणा सुद्धा या तस्करीवर आळा घालण्यासाठी सतर्क आहे.
Published on

शुभम देशमुख 

भंडारा : कत्तलखान्याकडे नेत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी शहरातील लाखांदूर (Bhandara) फाट्यावर कत्तलखान्याकडे जाणारा कंटेनर पोलिसांनी अडवून कंटेनरमध्ये निर्दयीपणे भरलेल्या ४० गोवंशाची सुटका केली. ही कारवाई साकोली (Police) पोलिसांनी केली आहे. (Latest Marathi News)

Bhandara News
CCTV Video: भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याचा लहान मुलावर हल्ला; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

अवैध धंदे करणारे तस्कर वेगवेगळी शक्कल लढवून तस्करी करीत आहेत. पोलीस यंत्रणा सुद्धा या तस्करीवर आळा घालण्यासाठी सतर्क आहे. या दरम्यान भंडारा जिल्ह्यात गोवंश तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मागील काळात यशस्वी प्रयत्न केले आहे. मात्र काही जुने व नवीन गोवंश तस्कर पुन्हा नवनवीन पद्धत वापरून गोवंश तस्करीत सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर कंटेनरमधून निर्दयीपणे कोंबून ४० गोवंशांना (Cattles) कत्तलखान्याकडे नेत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी शहरातील लाखांदूर फाट्यावर कत्तलखान्याकडे जाणारा कंटेनर पोलिसांनी अडवून कंटेनरमध्ये निर्दयीपणे भरलेल्या ४० गोवंशाची सुटका केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhandara News
Bogus Doctor : दहावी नापास बनला डॉक्टर; धुळ्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांनी तीन ठिकाणी टाकले छापे

तीन जणांवर गुन्हा दाखल 

सदरची कारवाई साकोली पोलिसांनी केली असून ११ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कंटेनर मालकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये कंटेनर मालक निजामुद्दीन नजीरुद्दीन (वय ४५, रा. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर), चालक अब्दुल राजिक अब्दुल खालिक (वय ३०) आणि शेख नशीर शेख याशीन (वय ३५) यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com