धुळे : धुळे जिल्ह्यात मागील आठवड्यात चार बोगस डॉक्टराना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर आज आणखी (Dhule) तीन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी तीन बोगस डॉक्टरांना (Bogus Doctor) ताब्यात घेतले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे दहावी नापास व्यक्ती डॉक्टर बनून उपचार करत असल्याचे उघड झाले आहे. (Tajya Batmya)
धुळे जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे कंबर कसली असून, गेल्या आठवड्यात देखील या संदर्भात कारवायांचा धडाका पोलीस (Police) प्रशासनातर्फे सुरू होता आणि पुन्हा एकदा जिल्हाभरातील तीन बोगस डॉक्टरां संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करून तीन बोगस डॉक्टरांना ताब्यात घेतले. यापूर्वी देखील सात बोगस डॉक्टरांना पोलिसांनी छापेमारी करून ताब्यात घेतले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सर्वच आजारांवर बोगसपणे इलाज
एक बोगस डॉक्टर दहावी नापास असल्याचे देखील उघडकीस आले आहे. तर ज्या विषयाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, अशा देखील आजारांवर या बोगस डॉक्टरांतर्फे बोगसपणे ईलाज सुरू असल्याचे देखील या कारवाईदरम्यान उघडकीस आले आहे. या सर्व बोगस डॉक्टरां विरोधामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस प्रशासनातर्फे सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.