Yawal Forest Aria : यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन

Jalgaon News : अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा कधीकाळी जगभरात दखलपात्र होती. परंतु काही कालावधीने येथील वन संपदा कमी होत गेली.
Tiger Yawal Forest Aria
Tiger Yawal Forest AriaSaam tv
Published On

जळगाव : यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या सीमेवर जंगलामध्ये यावल प्रादेशिक वन विभाग यांनी (Jalgaon) लावलेल्या लावलेल्या उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघाची (Tiger) छबी कैद झाल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. यामुळे यावल अभयारण्यात वाघ असल्याचे उघड झाले आहे. (Breaking Marathi News)

Tiger Yawal Forest Aria
Palghar Crime : बँकेने ताब्यात घेतलेल्या कंपनीतून चोरी; ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

मेळघाट ते अनेर डॅम या नैसर्गिक टायगर कॉरिडॉर असल्याने कोरोना काळातही यावल अभयारण्यामध्ये २०२१ मध्ये वाघ आढळून आला होता. यानंतर (Forest Department) वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये असलेला वाघ दिसून आला आहे. मात्र हा वाघ नर आहे कि मादी आणि याचे साधारण वय किती हे समजले नाही. परंतु याबाबतची माहिती लवकरच उपलब्ध होईल; असे यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांनी दिली‌ आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tiger Yawal Forest Aria
Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांचे धरणे; राज्य शासनासह मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी

अभयारण्यात वन्यजीव संपदा 

जळगाव जिल्ह्यात येत असलेल्या १७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर यावल अभयारण्य पसरले आहे. या अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा कधीकाळी जगभरात दखलपात्र होती. परंतु काही कालावधीने येथील वन संपदा कमी होत गेली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com