जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या संकटमोचकाची बिनविरोध निवड; शिवसेनेने ही पहिल्यांदाच फडकवला भगवा

Girish Mahajan and Shinde Sena MLA's Son Sumit Patil: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन आणि आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
GIRISH MAHAJAN, SUMIT PATIL ELECTED
GIRISH MAHAJAN, SUMIT PATIL ELECTEDsaam tv
Published On: 

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. जामनेर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजप कार्यकर्ते तुकाराम विठोबा निकम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत गिरीश महाजन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाजन यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्यासह रघुनाथ पाटील आणि तुकाराम विठोबा निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रघुनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याविरोधात त्यांनी नाशिक येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात हरकत दाखल केली होती. मात्र तिथेही त्यांची हरकत फेटाळण्यात आली.

GIRISH MAHAJAN, SUMIT PATIL ELECTED
Maharashtra Government: राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, फडणवीस सरकारने घेतले ४ मोठे निर्णय

दरम्यान आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तुकाराम निकम यांनी आपला अर्ज मागे घेत गिरीश महाजन यांना पाठिंबा दिला. आपण गिरीशभाऊंच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

GIRISH MAHAJAN, SUMIT PATIL ELECTED
Online Shopping Scam : ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली नवा स्कॅम! ऑर्डर न करताही घरी पाठवले पार्सल, ग्राहकांकडून उकळले जातात पैसे

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांच्या मुलाची ही बाजी

तर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे सतीश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुमित पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमित पाटील हे पाचोरा विकास सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, ते पहिल्यांदाच जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक लढवत असून पहिल्याच प्रयत्नात त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.