Jalgaon Cyber Crime: पार्टटाईम जॉबच्या नावाखाली तरुणाची फसवणुक

पार्टटाईम जॉबच्या नावाखाली तरुणाची फसवणुक
Jalgaon Cyber Crime
Jalgaon Cyber CrimeSaam tv
Published On

जळगाव : पार्ट टाईम जॉब असल्याचे सांगत तरुणाच्या मोबाईलवर लिंक पाठविली. तरुणाने रिचार्जवर अधिक पैसे मिळत (Cyber Crime) असल्याचे अमिष दाखवून तरुणाच्या खात्यातून १ लाख ३५ हजार रूपये परस्पर ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याची घटना घडली. जिल्हापेठ (Police) पोलिस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Jalgaon Cyber Crime
Reliance Theft: 14 नव्हे, तर 6 कोटींचा दरोडा; रिलायन्स ज्वेल्सकडून सांगली पोलिसांना पत्र

जळगाव शहरातील राधाकिसन वाडी परिसरात भूषण अजित चौधरी वास्तव्यास असून, ते खासगी नोकरी करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. गेल्या १४ एप्रिलला त्यांच्या मोबाईलवर पार्ट टाईम जॉब संबंधित मॅसेज आला होता. त्यानंतर (Jalgaon) त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर एक लिंक प्राप्त झाली. त्यांनी आपला ईमेल आयडी टाकून ती लिंक ओपन केली. त्यानंतर चौधरी यांनी शंभर रुपयांचा रिचार्ज केल्यास त्यांना २४० रुपये, तर ५०० रुपयांचा रिचार्ज केल्यास ९५० रुपये मिळतील, असा (Fraud) मॅसेज प्राप्त झाला.

Jalgaon Cyber Crime
Ashadhi Wari 2023: पाऊले चालती पंढरीची वाट..., एका क्लिकवर मिळवा पालखी सोहळ्याचे लोकेशनसह सर्व अपडेट

त्यानंतर पुन्हा एक लिंक पाठविली असताना भूषण चौधरी यांनी ती लिंक क्लिक केली. त्यानंतर त्यावर आपली माहिती भरून चौधरी यांनी शंभर रुपयांचे पेमेंट केले होते. चौधरी यांनी समोरील व्यक्तीने पाठविलेल्या लिंकवर जावून वेळोवेळी त्यांनी सांगितल्याप्रमणे यूपीआय पेमेंट करुन सुमारे १ लाख ३५ हजार रुपये रिचार्जसाठी पाठविले होते. परंतु, पैसे पाठवूनदेखील जॉब लागत नसल्याने तरुणाला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्याने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com