Ashadhi Wari 2023: पाऊले चालती पंढरीची वाट..., एका क्लिकवर मिळवा पालखी सोहळ्याचे लोकेशनसह सर्व अपडेट

Pandharpur Wari 2023: यावर्षी ज्यांना वारीमध्ये सहभागी होता येणार नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023Saamtv

अक्षय बडवे, पुणे

Sant Dnyaneshwar Mauli Palkhi: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या आषाढी वारीला (Ashadhi Wari 2023) सुरुवात झाली आहे. विठ्ठल भेटीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या वारकऱ्यांसाठी आषाढी वारी सोहळा खूपच महत्वाचा मानला जातो. हे विठ्ठलभक्त दरवर्षी वारीसोबत पंढरपूरला जातात आणि विठ्ठूरायाचे (Vithuraya) दर्शन घेतात. यावर्षी ज्यांना वारीमध्ये सहभागी होता येणार नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना फक्त एका क्लिकवर तर संपूर्ण वारीसोहळा पाहता येणार आहे. त्याचसोबत त्यांना वारीसंदर्भातील सर्व अपडेट्स देखील एका क्लिकवर मिळणार आहेत.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023: संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज मार्गस्थ होणार; असा असेल प्रस्थान सोहळा

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा लाइव्ह अनुभवता यावा याकरिता जीपीएसद्वारे पालखी ट्रेकिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावर्षी पहिल्यांदा दोन्ही पालख्यांचे अपडेट जीपीएसद्वारे मिळणार आहे. आळंदी येथून पंढरीच्या दिशेने प्रस्थान झालेल्या ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधून प्रस्थान झालेल्या संत तुकाराम महाराजांची पालखी 12 जून रोजी पुण्यात दाखल होणार आहे.

Ashadhi Wari 2023
Baramati Accident News: पुणे पंढरपूर महामार्गावर एसटी अन् पिकपचा भीषण अपघात; वारकरी जखमी

पालखी सोहळ्यानिमित्त पुणे पोलिसांचा शहरामध्ये कडक बंदोबस्त आहे. त्याचसोबत जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी पुणे पोलिसांनी वारीची माहिती देण्यासाठी एक वेबसाइट तयार केली आहे. diversion.punepolice.gov.in या वेबसाइटवर सर्वांना पालखी सोहळा आणि वाहतूक मार्गातील बदलाची माहिती मिळणार आहे.

Ashadhi Wari 2023
Mumbai Crime News: धुमधडाक्यात लग्न लागलं, पण हनिमूनच्या रात्रीच नवरी फरार; दागिने आणि रोकडही केली लंपास

पालखी सोहळ्याचे लाइव्ह लोकेशन मिळण्यासाठी दोन्ही पालख्यांबरोबर चार दुचाकी ठेवण्यात येणार असून त्यावर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारेच पालखीसंदर्भात सर्व माहिती मिळणार असल्यामुळे वारकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. तर जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देखील देहूतून पंढरीकडे प्रस्थान केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com