Ashadhi Wari 2023: संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज मार्गस्थ होणार; असा असेल प्रस्थान सोहळा

विठू नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगाचे स्वर याने संपूर्ण आळंदी नगरी भक्तीमय रसात नाहून निघाली आहे.
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023Saam Tv

Pandharpur Wari 2023: कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज होणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण आळंदी नगरी आज दुमदुमून निघालेली आहे. विठू नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगाचे स्वर याने संपूर्ण आळंदी नगरी भक्तीमय रसात नाहून निघाली आहे. मंदिराची रंगरंगोटी, विविधरंगी पुष्प सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

Ashadhi Wari 2023
Monsoon Update: गुड न्यूज! येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार; बिपरजॉयचा धोका टळला? वाचा IMDचा अंदाज

संपूर्ण दिनक्रम असा असेल

पहाटे ४ वाजता मंदिरात घंटानाद.

पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी काकड आरती संपन्न.

पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत श्रींच्या चलपादुकांवर भक्तांकडून महापूजा.

सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे स्पर्श.

सकाळी नऊ ते अकरा दरम्यान मंदिराच्या विना मंडपात कीर्तन होईल.

दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता होईल त्यानंतर महानैवेद्य दाखवण्यात येईल.

दुपारी साडेबारा ते एक दरम्यान भाविकांना समाधीचे दर्शन घेता येईल.

दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत मानाच्या 47 दिंड्यांना मंदिर प परिसरात प्रवेश दिला जाईल याच दरम्यान संजीवन समाधी मंदिरात श्रींचा पोशाख देखील केला जाईल.

त्यानंतर दुपारी चार नंतर पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. (Pandharpur News)

Ashadhi Wari 2023
Wrestlers Protest: 'मुलगी अल्पवयीन की नाही हे तिच्या कुटुंबातील सदस्यच सांगू शकतात', बजरंग पुनियाने सांगितले पीडितेचे वक्तव्य का बदलले

श्री गुरु हैबतबाबा यांचेतर्फे आरती होईल. त्यानंतर संस्थानातर्फे श्रींची आरती होईल. त्यानंतर प्रमुख मानकऱ्यांना नारळाचा प्रसाद दिला जाईल. त्यानंतर विना मंडपात असणाऱ्या पालखीमध्ये श्रींच्या चलपादुकांना प्राणप्रतिष्ठा केली जाईल. संस्थांतर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटे दिली जाईल. यानंतर श्री गुरु हैबत बाबा यांच्यातर्फे मानाच्या दिंडींप्रमुख प्रतिष्ठित मानकरी यांना नारळाचा प्रसाद दिला जाईल.

त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे विना मंडपातून प्रस्थान होईल मंदिर प्रदक्षिणा करून पालखी महाद्वारातून बाहेर आणली जाईल आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम हा गांधीवाड्यात असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com