Wrestlers Protest: 'मुलगी अल्पवयीन की नाही हे तिच्या कुटुंबातील सदस्यच सांगू शकतात', बजरंग पुनियाने सांगितले पीडितेचे वक्तव्य का बदलले

कुस्तीपटू बजरंग पुनियाने सांगितले की, आम्हाला आशा आहे की 15 जूनपूर्वी आमच्या समस्या दूर होतील. तसे न झाल्यास आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू.
Wrestlers Protest Latest News In Marathi
Wrestlers Protest Latest News In MarathiSaam Tv
Published On

Wrestlers Protest News Today: ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणार्‍या कुस्तीपटूंपैकी एका कुस्तीपटूचे विधान बदलण्याच्या प्रकरणाने आता जोर धरला आहे. या प्रकरणावर आता ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने सांगितले की, मुलीचे कुटुंबीयच ती अल्पवयीन आहे की नाही याची योग्य माहिती देऊ शकतात.  (Latest Marathi News)

Wrestlers Protest Latest News In Marathi
Parbhani Accident News : परभणीत दारूचा ट्रक पलटी, चालक जखमी! मदत सोडून नागरिकांचा बाटल्यांवर डल्ला

पुढे बजरंग पुनिया म्हणाले की, मुलीच्या वडिलांनी माझ्यावर दबाव असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी विधान बदलले आहे. आपले संपूर्ण कुटुंब नैराश्यात असल्याचेही त्यांनी मला सांगितले. ब्रिजभूषण सारखे लोक बाहेर फिरत राहिले तर मुलींचे काय होणार. खेदाची बाब म्हणजे पैलवान मंत्र्यांशी तडजोड करत असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. 

आणखी काय म्हणाले बजरंग पुनिया?

ते म्हणाले की, आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आहे. आमच्या मागण्या ऐकून घेतल्या जातील, असे आश्वासन सरकारने पैलवानांना दिले आहे. आम्हाला आशा आहे की 15 जूनपूर्वी आमच्या समस्या दूर होतील. तसे न झाल्यास आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू असे देखील ते म्हणाले. 

Wrestlers Protest Latest News In Marathi
Baramati Accident News: पुणे पंढरपूर महामार्गावर एसटी अन् पिकपचा भीषण अपघात; वारकरी जखमी

खाप पंचायतीने अल्टिमेटम दिला

बजरंग पुनिया पुढे म्हणाले की, खेळाडूंच्या वतीने पंचायत बोलविण्यात आली होती. आमचा मुद्दा आम्ही पंचायतीसमोर ठेवला. सरकारने 15 तारखेपर्यंत वेळ दिल्याचे खाप पंचायतीकडून सांगण्यात आले. 15 तारखेनंतर काही झाले नाही तर पुन्हा आंदोलन करू. सरकारने आम्हाला आश्वासन दिले आहे की 15 जूनपूर्वी आरोपपत्र दाखल केले जाईल आणि ब्रिजभूषण आणि त्यांचे सहकारी WFI चे सदस्य होणार नाहीत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com