Reliance Theft: 14 नव्हे, तर 6 कोटींचा दरोडा; रिलायन्स ज्वेल्सकडून सांगली पोलिसांना पत्र

Reliance Jewels Robbery Case Update: रिलायन्सच्या वतीने सुधारित पत्र पोलिसांना देण्यात आले आहे.
Reliance Theft
Reliance TheftSaam Tv
Published On

Sangli News Today: सांगली शहरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवरील दरोड्यात दरोड्यांनी १४ कोटी ६९ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे फिर्यादीत म्हटले होते. मात्र, शनिवारी रिलायन्सच्या वतीने सुधारित पत्र पोलिसांना दिले. (Latest Marathi News)

Reliance Theft
Mumbai Heat Wave: मुंबईत जूनमधील विक्रमी तापमानाची नोंद, 2 दिवसांत नागरिकांना दिलासा मिळणार

त्यात सहा कोटी ४४ लाख ३०० चा ऐवज लंपास झाल्याचे म्हटले आहे. रविवारी (4 जून रोजी) दुपारी दरोडा पडल्यानंतर १४ कोटींचा ऐवज लंपास झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतरच्या फिर्यादीत १४ कोटी ६९ लाख ३०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास (Theft) केल्याचे म्हणण्यात आले होते.

मात्र, शनिवारी रिलायन्सच्या वतीने एक पत्र पोलिसांना देण्यात आले आहे त्यात हिरे व सोन्याचे दागिने असलेली पिशवी पेढीतच आढळून आल्याने सहा कोटी ४४ लाख ३०० रुपयांचाच माल चोरट्यानी लंपास केल्याचे पत्रात म्हटले आहे. (Sangli News)

Reliance Theft
Crime News : वडिलांच्या मित्रानेच केला घात; 50 रुपयांचे आमीष दाखवून 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

वसंतदादा मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्स या दुकानातून रविवारी(4 जून रोजी) भरदिवसा दरोडेखोरांनी १४ कोटी रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने लुटले होते. पोलिसांनी या घटनेनंतर तपास सुरू ठेवला आहे. एलसीबीसह पोलिसांची पथके विविध ठिकाणी तपासासाठी रवाना झाली आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि बिहार येथेच तपासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यातही बिहारमध्ये स्थानिक पोलिसांना सूचना देत तपास सुरु ठेवला आहे. हैदराबादमध्ये गेल्या दोन दिवसांपासून करण्यात आलेल्या तपासणीतूनही काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com