Fraud Case : मुलीला तहसीलदार बनविण्याचे आमिष; महिलेची साडेदहा लाख रूपात फसवणूक

Jalgaon News : मुलीला तहसीलदार बनवून देते' असे सांगत विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरून घेतले. तसेच, यासाठी लागणाऱ्या रक्कमेची मागणी करत महिलेकडून वेळोवेळी रोकड स्वरूपात रक्कम घेतली
Fraud Case
Fraud CaseSaam tv
Published On

जळगाव : निकरीला लावून देण्याचे आमिष देत गंडविल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच जळगावात एका महिलेची तब्बल साडे दहा लाख रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात महिलेच्या मुलीला डायरेक्ट तहसीलदार बनविण्याचे आमिष देण्यात आले होते. या आमिषाला बळी पडत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव शहरातील एका महिलेला तिच्या मुलीला तहसीलदार बनवायचे होते. यातच महिलेची ज्योती अशोक साळुंखे या महिलेशी ओळख झाली होती. त्यानुसार ज्योती साळुंकेने महिलेला विश्वासात घेत तुमच्या मुलीला तहसीलदार बनवून देते' असे सांगत विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरून घेतले. तसेच, यासाठी लागणाऱ्या रक्कमेची मागणी करत महिलेकडून वेळोवेळी रोकड स्वरूपात रक्कम घेतली. 

Fraud Case
Badlapur Palika : चिकन वेस्टेजपासून कंपोस्ट खत निर्मिती; बदलापूर नगरपालिकेचा अभिनव प्रयोग

मुलीला तहसीलदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलेने सव्वा चार लाख रुपये रोख तसेच तीन लाख रुपये किंमतीचे दागिने दिले. याशिवाय टप्प्याटप्प्याने आणखी काही रक्कम दिली आहे. अशा प्रकारे एकूण १० लाख ५३ हजार ९५० रुपयांत महिलेची फसवणूक झाल्याचा समोर आले आहे. तसेच तक्रारदार महिलेच्या माध्यमातून इतरांचे वेगवेगळ्या शासकीय योजनेचे लाभाचे अर्ज भरून घेत त्यासाठी लोकांकडून गोळा केलेले साडे तीन लाख सुद्धा लूट केल्याचे समोर आले आहे. 

Fraud Case
Ahilyanagar Water Crisis : ६० गावे, वाड्या- वस्त्या तहानलेल्या; नगरसह चार तालुक्यांमधील गावे टँकरवर अवलंबून

पोलिसात गुन्हा दाखल 

फसवणूक झाल्याचा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला आहे. बरेच दिवस होऊन देखील काम होत नाही. तसेच दिलेल्या पैशांची मागणी केल्यानंतर देखील ते मिळाले नाहीत. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात ज्योती पाटीलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com