Shocking : बाप नाही हैवान! घरात कोणीही नसल्याची संधी साधून पोटच्या मुलीवर अत्याचार ; जळगावमधील धक्कादायक घटना

Jalgaon Crime News : जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार केल्याचा आरोप. पोलिसांनी आरोपीला अटक करून POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsAI Image
Published On
Summary
  • जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे घडली घटना

  • अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार

  • पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली

  • पोलिसांचा पुढील तपास सुरूर आहे.

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी बापाला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.मृत मुलीचे वडील म्हणजेच आरपीचे नाव भास्कर भिल असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपीचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला होता. कौटुंबिक वादानंतर पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यावेळी घरात दोन मुली आणि एक मुलगा होते. याच दरम्यान शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित भास्कर भिल याने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Jalgaon Crime News
EPFO ची विशेष मोहीम! कर्मचाऱ्यांना मिळणार PF, EPS आणि EDLIचा लाभ, ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घ्या 'हे' काम

घटनेनंतर पीडित मुलगी मानसिक धक्क्यात होती. मात्र, दुसऱ्या दिवशी तिने धाडस करून आपल्या आजीला घडलेला प्रकार सांगितला. आजीला घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला.

Jalgaon Crime News
IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २३ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

प्राथमिक चौकशीनंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी स्वप्नील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून घटनेशी संबंधित विविध बाबींची चौकशी केली जात आहे. अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांकडून अत्याचार झाल्याची घटना समोर आल्याने मोहाडीसह जामनेर परिसरात या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com