जळगाव : परिसरात मंदिर उभारणी झाल्याने प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी शिवलिंग आणावयाचे होते. यामुळे काहीजण (Jalgaon) शिवलिंग घेण्यासाठी मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे जाण्यासाठी सकाळीच निघाले. मात्र घरापासून अवघे तीन किलोमीटर अंतरावर पोहचताच काळाने घाला घातला. बांभोरी (ता. धरणगाव) येथे सकाळी सात वाजता हा (Accident) अपघात घडला असून यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण जखमी आहेत. (Breaking Marathi News)
जळगाव शहरातील खोटेनगर परिसरातील साईनगर या भागातील भूषण सुभाष खंबायत (वय ३५), विजय हिम्मत चौधरी (वय ४०), तुषार वासुदेव जाधव (वय २८) यांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत. खोटेनगरच्या साईनगर भागात मंदिर उभारणी करण्यात आली आहे. यात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. मंदिराचे काम पूर्ण झाल्याने शिवलिंग घेण्यासाठी आज (१५ मार्च) ओंकारेश्वरला (Madhya Pradesh) जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी खाजगी गाडी करण्यात आली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अवघ्या पाच मिनिटात अपघाताची आली बातमी
ठरलेल्या नियोजनानुसार परिसरातील ७ ते ८ जण सकाळी पावणेसातच्या सुमारास घरून निघाले. घरातील सर्व मंडळी व मंदिर ट्रस्टीची भेट घेऊन भगवान शंकरचा जयजयकार करत मार्गस्थ झाले. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी (ता. धरणगाव) गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने या भाविकांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चजण जखमी असून त्यांना उपचारासाठी जळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृतांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.