Dhule Accident : भरधाव कारची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Dhule News : नीलेश पाटील हा पुण्यातील औषध कंपनीत एमआर म्हणून नोकरी करत होता. निलेश हा १२ मार्चला मित्रासोबत दुचाकीने धुळ्याहून कापडणे येथे जात होता.
Dhule Accident
Dhule AccidentSaam tv
Published On

धुळे : पुणे येथे कामाला असलेल्या मुलाचा विवाह करायचा असल्याने घरच्यांनी मुलगी पाहण्याच्या कामासाठी (Dhule) मुलाला घरी बोलावले. दरम्यान कापडणे (ता. धुळे) येथे घरी आलेल्या या तरुणाचा दुचाकी अपघातात (Accident) मृत्यू झाला. नीलेश विनायक पाटील (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

Dhule Accident
Students Refund Exam Fee : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क मिळणार परत; बँक खात्यात जमा होणार रक्कम

नीलेश पाटील हा पुण्यातील (Pune) औषध कंपनीत एमआर म्हणून नोकरी करत होता. निलेश हा १२ मार्चला मित्रासोबत दुचाकीने धुळ्याहून कापडणे येथे जात होता. या दरम्यान मुंबई- आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दोघेजण फेकले गेल्याने या अपघातात नीलेश व त्याचा मित्र अनिकेत संजय सैंदाणे (२४, रा. कापडणे) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Dhule Accident
Badlapur News : तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; बदलापूरच्या पूरनियंत्रण रेषा बाधितांचा इशारा

उपचारादरम्यान निलेशच्या मृत्यू 

गंभीर जखमी असलेल्या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या दरम्यान उपचार सुरू असताना नीलेशचा मृत्यू झाला. याबाबत माजी सैनिक अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून कारचालक सुनील राठोड (रा. जापी शिरडाणे, ता. धुळे) याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com