शाळेत जाताना भटक्या कुत्र्याच्या जीवघेणा हल्ला; चेहऱ्यावर पडले ८० टाके, उपचारादरम्यान ९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

busawal shocking : शाळेत जाताना भटक्या कुत्र्याच्या जीवघेणा हल्ल्यात ९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 9 वर्षीय मुलाच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
stray dog on child
stray dog Saam tv
Published On

भुसावळात कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

९ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरभर हळहळ व्यक्त

भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर

देशासहित महाराष्ट्रातील विविध भागात सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. भुसावळच शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. गेल्या काही महिन्यात सार्वजनिक ठिकाणी वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भुसावळमधील नारायणनगरमधील भटक्या कुत्र्याने ९ वर्षीय विद्यार्थ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

९ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरलं आहे. पालकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तारकेश विशाल झोपे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तारकेशसोबत शाळेत जाताना दुर्दैवी घटना घडली.

stray dog on child
भाजपमध्ये गेलेले ७ खासदार पुन्हा आम आदमी पार्टीत परतणार? काय आहे राइट टू रिकॉल?

त्या दिवशी काय घडलं?

तारकेश विशाल झोपे २४ एप्रिल रोजी सकाळी शाळेत जात होता. नारायण नगर परिसरात पोहोचल्यानंतर एका कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर जखमा झाल्या. जखमांची तीव्रता इतकी होती की मुलाच्या चेहऱ्यावर तब्बल ८० टाके पडले होते.

stray dog on child
Pune : तू रोगीट..." पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, नवऱ्याच्या आणि सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

या घटनेनंतर प्रकृती गंभीर असल्याने तसेच प्लास्टिक सर्जरीची गरज भासल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्याची प्राणज्योत मालवली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे झोपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

चिमुकलीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा रुग्णालयावर आरोप

जळगावच्या चाळीसगावमध्ये पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे उशिरा रुग्णालयात पोहोचल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com