ऑटोचा भीषण अपघात, सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, जळगावमध्ये हळहळ

Horrific Auto Accident in Jalgaon : जळगावमधील जुना निमखेडी रोडवर भरधाव वाहनाने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये शिवसेनेच्या शहरप्रमुख ज्योती शिवदे यांचे पती व दीर आहेत. शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Hingoli Accident
Hingoli AccidentSaam Tv News
Published On

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Jalgaon auto accident, two brothers die : जळगावमध्ये जुना निमखेडी रोडवर ऑटो रिक्षाचा भयंकर अपघात झाला. भरधाव वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्यामुळे अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ऑटो रिक्षामधील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर जळगावमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ऑटो रिक्षाच्या अपघातात ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद झगडू शिवदे या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. मयत ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेनेच्या जळगाव शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती आहेत तर प्रमोद शिवदे हे दीर आहेत. ऑटोचा अपघात झाल्यानंतर जुना निमखेडी रोडवर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत वाहतूक सुरळीत केले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आले आहे.

Hingoli Accident
लग्नावरून येताना काळाने गाठले, टँकर अन् कारचा भयंकर अपघात, एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

जळगावमध्ये भोई कुटुंबाचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे. त्यासाठीचं साहित्य तसेच माल तयार करण्यासाठी शिवदे बंधू पहाटे चार वाजता रिक्षाने जात होते. यादरम्यान निमखेडी रोडवर अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षा चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ऑटो चालकाचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Hingoli Accident
Car Fire : शिर्डीवरून परत जाताना कारला भयंकर आग, शिक्षकाचा होरपळून मृत्यू, दोन जण वाचले

जळगावमधील जुना निमखेडी रोडवर अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महानगराध्यक्ष तसेच महिला गाडीचा जिल्हाप्रमुख यांनी जिल्हा धाव घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे जळगावमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Hingoli Accident
Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कारवाई, दिग्गजाची पक्षातून हकालपट्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com