Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कारवाई, दिग्गजाची पक्षातून हकालपट्टी

Sudhakar Badgujar Nashik News : शिवसेना (ठाकरे गट) ने नाशिकमध्ये मोठी कारवाई करत उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Uddhav thackeray Latest News
Uddhav thackeray NewsSaam tv
Published On

Uddhav Thackeray Shiv Sena Nashik News : नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करम्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांनी दिली. पक्षविरोधी कारवाई केल्याने बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नाशिकमध्ये ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली.

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. बडगुजर आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली होती. त्याशिवाय बडगुजर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या असल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणात सुरू होती. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव आणि महायुतीची एक हाती आलेली सत्ता, यामुळे अडचणीत आलेले बडगुजर यांच्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा नाशिकमध्ये अधूनमधून होत होत्या. आता थेट बडगुजर यांनीच पक्ष संघटनेतील बदलावेळी आपल्याला विश्वासात न घेतल्याचं जाहीरपणे म्हटलं. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे पक्ष सोडण्याचे संकेत असल्याची चर्चा पुन्हा नाशिकमध्ये सुरू झाली. आज ठाकरे गटाकडून बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Uddhav thackeray Latest News
लग्नावरून येताना काळाने गाठले, टँकर अन् कारचा भयंकर अपघात, एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू
जिल्हाप्रमुखांचा फोन आला, मी पत्रकार परिषदेला उपस्थित आहे. माझ्या घरी लग्नकार्य असल्यानं मी संजय राऊत यांना सांगून एक महिना सुट्टी घेतली होती. मी आता इथे उपस्थित आहे. बडगुजर यांच्याशी देखील माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, मी पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही. मी माझ्या भावना तुम्हाला नंतर सांगेन. आपलेच दात आणि आपलेच ओठ. मी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडेन. ही पत्रकार परिषद जिल्हाप्रमुखांची, प्रोटोकॉल प्रमाणे मी बोलणं चुकीचं आहे. जिल्हाप्रमुख बदलले आम्ही त्यांचं स्वागत केलं. साहजिकच प्रत्येकाची अपेक्षा असते, मात्र शिवसैनिक आदेशावर चालतो. पक्षातील लोकांनी मला राजीनामा देण्यापासून थांबवलं.
विलास शिंदे, महानगर प्रमुख

कोण आहेत सुधाकर बडगुजर -

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते म्हणून कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीवेळी एकट्याने खिंड लढवत पक्षाचा खासदार निवडून आणला. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा बडगुजर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. महापालिकेत नगरसेवक असतांना स्वतःच्याच कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी ACB कडून चौकशी झाली. ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती.

Uddhav thackeray Latest News
Seat-Sharing : मुंबई, ठाण्यात महायुतीचं बार्गेनिंग सुरू, कोण किती जागावर लढणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com