जळगाव : अजूनही उकाडा जाणवत असल्याने कुलरचा वापर अजूनही सुरूच आहे. उकाडा जाणवत असल्याने घरात सुरु असलेल्या कुलरजवळ गेलेल्या महिलेचा धक्का कुलरला लागला. यात वीज प्रवाह उतरला असल्याने विजेचा जोरदार झटका बसून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे घडली.
अमळनेर तालुक्यातील जवखेडा यायेथील योगिता सुनील गोसावी (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मागील दोन दिवस झाले दुपारी कडक ऊन पडत असल्याने उष्णतेची दाहकता जाणवत असून यासोबतच उकाडा देखील जाणवतो. यामुळे दिवसा व रात्री देखील उकाडा जाणवत असल्याने कुलरच वापर सुरु आहे. दरम्यान दिनेश गोसावी दिलेल्या खबरीनुसार ९ जूनला सायंकाळी योगिता गोसावी या कुलरजवळ गेल्या. यावेळी त्यात (Electric Shock) विद्युत प्रवाह शिरल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
विजेचा झटका बसल्याने योगिता गोसावी या ओरडल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कुटुंबीय धावत आले असता त्या खाली पडलेल्या दिसल्या. यानंतर त्यांना (Amalner) अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.