रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : पाण्याची भीषण टंचाई जाणवत असलेल्या मराठवाड्यात पाऊस झाला आहे. या पहिल्याच पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात अर्धा टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे पाण्याची चिंता मिटण्यास आता सुरवात झाली आहे.
जायकवाडी धरण (Jayakwadi dam) क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने ही पाण्याची आवक वाढली आहे. दरम्यान मागील वर्षी केवळ ४७ टक्केवर राहिलेला पाणीसाठा यंदाच्या उन्हाळ्यात साडेतीन टक्क्यावर आल्याने संपूर्ण मराठवाड्यावर जलसंकट निर्माण झालं होतं. मात्र संभाजीनगरवर (Sambhajinagar) आपत्कालीन पाणी पुरवठा कपात करण्याची तयारी प्रशासन करत असताना धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा टक्का वाढल्याने आणि आवक सुरू झाल्याने आता दिलासा मिळाला आहे.
४ हजार ८३७ क्युसेक पाण्याची आवक
जायकवाडी धरण क्षेत्रात दोन दिवसांपासून (Rain) पाऊस होत आहे. यामुळे धरणात पाणी येण्यास सुरवात झाली आहे. धरणात पहिल्याच पावसात ४ हजार ८३७ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे संभाजीनगरला आता महिनाभर पुरेल एवढा साठा पहिल्याच पावसाने जायकवाडी धरणात दाखल झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.